Friday, 20 June 2014

कापुस, सोयाबिन व धानाच्या हमी भावाचा प्रश्न महायुती रेटणार: शेतकरी नेते किशोर तिवारी यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचेशी चर्चा

कापुस, सोयाबिन व धानाच्या हमी भावाचा प्रश्न महायुती रेटणार 
शेतकरी नेते किशोर तिवारी यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचेशी चर्चा 
दिनांक - २०।०६।२०१४
     
     विदर्भाच्या शेतकय्रांच्या आत्महत्येचा प्रश्न मागील एक दशकापासुन सतत सरकार व समाजासमोर मांडुन नैराश्यग्रस्त कर्ज बाजारी शेतकय्रांना आत्महत्येच्या मार्गापासुन दुर नेण्यासाठी व शेतकय्रांचे आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटणाय्रा विदर्भ जनआंदोलन समितीने मोदी सरकार समोर महायुतीच्या खासदारामार्फत महाराष्ट्राच्या कोरडवाहु ९० लाख शेतकय्रांचा कापुस, सोयाबिन व धानाच्या हमी भावाचा प्रश्न रेटण्याचा निर्णय मातोश्री बंगल्यावर दिनांक १७ जुन रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व शिवसेना नेते आमदार सुभाषजी देसाई यांच्या सोबत झालेल्या ३ तासाच्या प्रदिर्घ चर्चेत घेण्यात आल्याची माहिती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली. महाराष्ट्राच्या कोरडवाहु शेतकय्रांसाठी मोदी सरकारने विशेष कृती कार्यक्रम घोषीत करावा याकरिता शिवसेनेने गांभीर्याने सर्व प्रश्नांचा व नैराश्याचा सखोल अभ्यास करणे सुरू केले असुन सर्व प्रश्नांची एकात्मीक मांडणी करून महाराष्ट्रात शेकतकय्रांच्या आत्महत्या व शेतकय्रांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी संकल्प केला असुन या प्रयत्नांचा पहिला टप्पा शेतकय्रांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळवुन देणे व शेतकय्रांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी व नैराश्याच्या मुळ प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्णय १७ जुन २०१४ च्या बैठकीत घेण्यात आला असुन महायुतीच्या खासदाराकडुन महाराष्ट्राच्या कोरडवाहु शेतकय्रांच्या हमी भाव व पिककर्ज यासारख्या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारने एक निश्चीत कार्यक्रम जाहीर करावा तसेच त्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत शेतकय्रांच्या घरी सुखाचे दिवस यावे यासाठी निश्चीत कार्यक्रम द्यावा, यासाठी महायुती मार्फत निश्चीत कालमर्यादेत वास्तविक परिस्थितीचे अभ्यासपुर्ण अवलोकन करून कृती कार्यक्रम घेवुन पुढे जाण्याचे निश्चित करण्यात आले व त्यासंबंधी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी १९ जुनच्या पत्रकार परिषदेत घोषणासुध्दा केली आहे. 
कापुस, सोयाबिन व धानाचे हमीभाव शेतकय्रांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण 

    मागील संपुआ सरकारने जाता जाता कृषीमुल्य आयोगामार्फत येणाय्रा हंगामामध्ये कापुस, सोयाबिन व धानाचे हमीभाव घोषीत करतांना कापसाला जेमतेम फक्त ५० रूपये भाववाढ दिली तर सोयाबिन व धानाच्या हमीभावाला पाने पुसले मात्र त्याचवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमुल्याचे हमीभाव लागवडीचा खर्च व त्यावर ५० टक्के नफा जोडुन निश्चीत करण्याचे व त्यासाठी या हमीभावावर शेतकय्रांचा माल घेण्यासाठी व्यापाय्रांसोबत सरकारने सुध्दा बाजारात व्यवस्था उभी करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. या हमीभावाच्या फार्म्युल्याने कापसाचा हमीभाव कमीत कमीत ६८०० रूपये प्रती क्विंटल व तर सोयाबिनचा ५४०० रूपये व धानाचा ३२०० रूपये प्रतिक्विंटल होणे आवश्यक आङे ही माहिती किशोर तिवारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांना संपुर्ण  अभ्यासपुर्ण व शेतकय्रांच्या वास्तविक खर्चाच्या आकडेवारीवर सादर केली मात्र फक्त हमीभाव घोषीत करून प्रश्न सुटणार नाही तर या हमीभावावर कापुस, सोयाबिन व धान विकत घेण्यासाठी सरकारी यंत्रणा व यंत्रणेला लागणारा पैसा या दोन्ही गोष्टी मोदी सरकारने आपल्या येणाय्रा अर्थ संकल्पात महाराष्ट्राच्या कोरडवाहु शेतकय्रांसाठी घोषीत कराव्या तसेच शेतकय्रांच्या आत्महत्या होणार नाही व शेतकय्रांच्या मुलांना आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारख्या मुळप्रश्नावर सरकारने तोडगा काढावा यासाठी महायुती मोदी सरकार समोर निश्चीत कार्यक्रम ठेवणार असुन शेतकय्रांच्या आत्महत्येचे कोणतेही राजकारण न करता हा प्रश्न सामाजिक बांधीलकीतुन सोडविण्याचे स्पष्ट आश्वासन शिवसेना पक्षप्रमुखांनी यावेळी दिले विदर्भ जनआंदोलन समितीने सादर केलेले अभ्यासपुर्ण मागणीपत्र महायुतीच्या सर्व पक्षांनी सोबत घेवुनच केंद्र सरकार समोर संयुक्तपणे दबाव टाकुन येत्या काही महिन्यात निश्चित ठोस निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडु व विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील कापुस, सोयाबिन व धान उत्पादक शेतकय्रांना दिलासा देवु असा विश्वास शिवसेना प्रमुखांनी या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली. 

No comments:

Post a Comment