Monday, 26 May 2014

गडकरी ,मुंडे व जावडेकर यांच्या मंत्रिमंडळाचा समावेशाने विदर्भाचे शेतकरी आनंदी: मात्र हंसराज अहीर यांचा समावेश न झाल्याचे निराशा

गडकरी ,मुंडे व जावडेकर यांच्या मंत्रिमंडळाचा समावेशाने विदर्भाचे शेतकरी आनंदी: मात्र हंसराज अहीर यांचा समावेश न  झाल्याचे निराशा 
यवतमाळ-२६मे २०१४
भारताच्या भाजप प्रणीत  'मोदी सरकारमध्ये ' विदर्भाचे राज्याचे भावी मुख्यमंत्री नितीन गडकरी, येणाऱ्या   महाराष्ट्राच्या युती सरकारचे  भावी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे   व सामान्य कार्यकर्त्याचे  प्रतिनिधी  प्रकाश जावडेकर मंत्री म्हणून समावेश  झाल्याने  विदर्भाचे  शेतकरी आनंदी झाले असून आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील,असा विश्वास , विदर्भातील शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे , मात्र ऐन शेवट्च्या समयी  चंद्रपूर खासदार हंसराज अहीर यांचा समावेश न झाल्यामुळे आमची निराशा झाली मात्र पुढच्या  विस्तारात त्यांना निश्चित  मंत्री  करण्यात असा आशावाद  आम्ही  ठेवत आहोत कारण त्यांना यवतमाळच्या केळापूर व वणी मतदार संघातील जनतेनी अभूतपूर्व पाठींबा दिला आहे व त्याचा आदर मोदी करतील असा विश्वास जनतेला आहे . 
नितीन गडकरी व   गोपीनाथ मुंडे हे शेतकरी असून यांना कोरडवाहू विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न  माहित असून  प्रकाश जावडेकर हे  जमिनीचे  अभ्यासु  नेते आहेत व  विदर्भात   शेतकर्यांनी कर्ज व नापिकीमुळे  आत्महत्या केल्याचा प्रश्न माहीत आहे व त्यांना  आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन आज पर्यंत झालेले नाही' संपूर्ण कर्ज माफी ,जमिनीचा अधिकार , परिवाराला मासीक आर्थिक मदत, अंत्योदय अन्न सुरक्षा, मोफत शिक्षण या मागण्यावर अनेक समित्यांनी अहवाल शिफारशी करूनही आज पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत  हे सुधा माहीत आहे  व ते  आमचे अश्रू पुसतील असा विश्वास , किशोर तिवारी यांनी दिली  आहे .
 संपुआ सरकारच्या महाराष्ट्राच्या  शेतकऱ्यांनी  नाकारण्याचे कारण  महाराष्ट्रचे  पांढरे  सोने असलेले कापूस हे नगदी पिक व  सोयाबीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्याचे झाले आहे व  यामुळे विदर्भ  हा  'शेतकरी आत्महत्यांचे माहेरघर '  म्हणून जगात समोर आले आहे कारण मागील दहा वर्षात विदर्भात सुमारे १० हजारावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून कापसाला लागणारा खर्च व मिळणारा हमीभाव व त्यामुळे मिळणारा बाजारभाव मधील मोठी तफावतच नैरायाचे प्रमुख कारण असून नरेंद्र मोदी यांनी वारंवार कृषी मूल्य आयोगाचे सनदी अधिकारी वातानुकुल कार्यालयात बसून हमीभाव तयार करतात व शेतकर्यांना बाजाराला लुटण्यासाठी मोकळे सोडतात यासाठी येणारे सरकार कृषी मूल्य आयोगाने पिकांचे हमीभाव निश्चित करताना पिकाला येणारा खर्च, खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किंमतीत झालेल्या वाढीचा विचार करून  याखेरीज शेतक ऱ्याला शेतीची कामे आणि पीक गोळा करण्यासाठी लागणारी मजुरी, कर्जाचे व्याज याचाही विचार करून यावर ५०% टक्के नफा जोडून या आधारावर पिकांचे हमीभाव निश्चित केले जातील अशी ठोस  घोषणा केली आहे तसेच महायुतीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे चांगले दिवस येणार आहेत या नव्या आशेवर शेतकरी मोदी सरकारची वाट पहात आहेत मात्र नरेंद्र मोदी यांचे संपुआ सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसु नये अशी विनंती नरेंद्र मोदींना विदर्भातील शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे .
संपूर्ण विदर्भातील शेतकर्‍यांचे नकदी पीक कापूस व सोयाबीन याचा हमीभाव सरकारने कापसाला ६ हजार ५00 रुपये प्रती क्विंटल तर सोयाबीनला ५ हजार रुपये द्यावा, पुरग्रस्त व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना कोणतीही अट न लावता सरसकट मदत द्यावी, पीककर्ज प्रलंबित सर्व शेतकर्‍यांचे जुने कर्ज माफ करुन नव्याने 
पीककर्ज द्यावे, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ अंत्योदय योजना अन्नसुरक्षा कायद्याखाली लागू कराव 
विदर्भातील उपासमारीला तोंड देत असलेल्या १0 हजारावर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍ांच्या कुटुंबाला मदत
 द्यावी, संपूर्ण उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण सुविधा तर कुटुंबासाठी आरोग्य सुविधा देण्यात याव्या या
 मागण्या  नरेंद्र मोदी सरकारला आम्ही करीत आहोत ,किशोर तिवारी यांनी सांगीतले
संपूर्ण विदर्भात ३0 लाख शेतकरी अतवृष्टी अभुतपूर्व गारपीटीमुळे नापिकीला तोंड देत आहे. परंतु सरकारने 
घोषित मदत फक्त २0 हजार शेतकर्‍यांना दिली आहे. शेतकर्‍यांना नवीन पीककर्जासाठी बँकाची दारे बंद 
झाली आहे. दुष्काळ पडला असतानाही सहकारी बँका पैसा नाही म्हणून तर सरकारी बँका आदेश नाही म्हणून नवीन पीककर्ज देण्यास नकार देत आहे यावर येणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे  सरकारने तोडगा काढवा  यासाठी नव्याने दबाव टाकणे सरू करण्यात येत आहे , किशोर तिवारी यांनी सांगीतले

No comments:

Post a Comment