Friday, 23 May 2014

केजरीवाल यांच्या गडकरी विरोधामागे कारस्थान - आपच्या पोरकट तमाशाने विदर्भाच्या लाखो जनतेच्या उपमान

केजरीवाल यांच्या गडकरी विरोधामागे कारस्थान - आपच्या पोरकट तमाशाने विदर्भाच्या लाखो  जनतेच्या  उपमान    
नागपूर -२४ मे २०१४
आपचे नेते अरविंद केजरीवाल हे मागील दोन वर्षापासून  नितीन गडकरी यांचेवर सतत बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप  करीत आहेत आता तांत्रीक कारण समोर करून  भारताचे नवे सरकार येत असताना तिहार जेलात जाण्याचा तमाशा हा  एका सुनियोजीत कटाचा भाग असून ज्या विघ्नसंतोषी मंडळी समोर  येउन मुकाबला करण्याची कुवत नाही त्यांनी केजरीवालाच्या खाद्यावर  बंदूक देऊन  हे कटकारस्थान करीत असून यामागे भारताचे सत्ता केंद्र नागपूर असू नये  हाच  हेतू  आहे असा गंभीर आरोप विदर्भाचे चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला आहे .
 दिल्ली येथे  सध्या समाज  शुद्धीकरणाचे  प्रयोगामागे जी विकृत मनोवृत्ती व  विघ्नसंतोषी मंडळीचा घाणेरडा उद्धेश आपण दोन वर्षापूर्वीच  जगासमोर आणला होता तो आता स्पष्ट होत आहे  कारण अरविंद केजरीवाल यांनी  दोन वर्षापूर्वी पोलखोल धंदा सुरु केला होतो व सनसनाटी आरोपामुळे त्यांना फुकट प्रसिद्धीही मिळत होती.  नितीन गडकरीवर  भ्रष्टाचाराचे आरोप  घोषणा केल्यानंतर  केजरीवाल यांनी  आमच्याशी सतत संपर्क साधला व माहिती साठी आग्रह धरला होता त्यावेळी मी त्यांच्या नागपूरच्या प्रमुखांना संपर्क केला व गडकरी मागील दहा वर्षापासून सत्तेवर नाहीत व युती काळात त्यांना अन्ना हजारे यांनीच चांगल्या कामाची पावती देली होती अशा वेळी  पुरावा नसलेल्या माहितीवर  पोलखोल कार्यक्रम करू नये असा सल्ला दिला होता मात्र  त्यावेळी  नागपूरच्या आप  प्रमुखांनी नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय  अध्यक्ष  होण्यापासून   रोखण्यासाठी हा  प्रकार असल्याचे त्यांनी मला सांगीतले या नंतरही   अरविंद केजरीवाल यांना बिनबुडाचे मोघम आरोप करू नये असा सल्ला आपण दीला होता तो  त्यांनी मानला नाही व आरोपपत्र  सादर केले यामुळे पडद्यामागील मंडळींची नितीन गडकरी  यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष  होण्यापासून रोखण्यात यश आले व अरविंद केजरीवाल यांचा आरोप  लावण्याच्या गोरखधंद्याला  गती  मिळाली मात्र यामुळे नव्या सरकारच्या निर्मातीमध्ये   विदर्भाच्या नेत्याचा  राष्ट्रीय  अध्यक्ष म्हणून  होऊ शकला नाही याला  आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना चालविणारी मंडळीच जबाबदार आहे आपण हे सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो कारण हा प्रकार मी जवळून पाहीला आहे ' असा  आरोप किशोर तिवारी यांनी  केला आहे. 
लोकसभा निवडणुकीमध्ये अंजली दमानिया नितीन गडकरी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी जबरदस्तीने उभे केले व फक्त नितीन गडकरी यांचेवर सतत बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप  करण्याचे आदेशच  दिले होते यामुळे  त्यांनी सुद्धा बिनबुडाच्या आरोपांचा सपाटा लावला होता मात्र मतदान कोणालाही करण्याचे आवाहनच केले होते यासर्व  कटामागे  नितन गडकरी यांनी लोकसभेत येण्यापासून रोखण्याच्या कुटील डाव होता मात्र नितीन गडकरी यांनी प्रचंड विजय मिळविला व हा कट हाणून पडला त्याच वेळी  अरविंद केजरीवाल यांना लोकांनी त्यांची जागा दाखवीली मात्र पडद्यामागून काड्या करणारी मंडळीने हार न मानता  नव्या भारत सरकारच्या रचनेत नितीन गडकरी कसे बाजूला सारले जातील याचे हालचाली सुरु झाल्या असून अरविंद केजरीवाल  यांची  सध्या सुरु असलेली नौटंकी   मागेही हीच मंडळी आहे कारण सरकार निर्मातीमध्ये  नागपूरची भूमिका नितीन गडकरीच्या  रूपाने  मागे राहावी हीच असून या संपूर्ण  प्रकारावर गंभीर चर्चा करावी ,अशी मागणी सुध्या किशोर तिवारी केली आहे . 
अरविंद केजरीवाल यांनी केलेले सर्व आरोप  निराधार आहेत त्यांना अब्रू-नुकसानीच्या खटल्यात जेलाची हवा खावी लागेल तोच प्रकार कपील सिब्बल प्रकरणात होणार आहे  . अरविंद केजरीवाल यांचा सुरु असलेला हा गोरघधंदा  आता सर्वाना किळसवाना वाटत आहे त्यावेळी  नितीन गडकरी यांना मतदान करणाऱ्या लोखो जनतेचा उपमान आहे कारण पुरावे असतीलतर कोर्टात सादर करून नितीन गडकरी यांना दोषी सिद्ध करावे नाहीतर विदर्भाच्या लोखो जनतेची माफी  मागावी अशी मागणी  किशोर तिवारी यांनी केली आहे . 

  

No comments:

Post a Comment