Friday, 14 March 2014

विदर्भ जनआंदोलन समिती करणार 'सरकार जागरण आंदोलन'-भीमकुंड नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत


विदर्भ जनआंदोलन समिती करणार 'सरकार जागरण आंदोलन'
भीमकुंड नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत
ॅ स्थानिक प्रतिनिधी/यवतमाळ

सरकारने घोषणा करूनही बँकांनी सक्तीची वसुली सुरूच ठेवल्यामुळे सर्व गावकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत झोपलेल्या सरकारला जागविण्यासाठी येत्या १५ मार्चला भीमकुंड येथे 'सरकार जागरण आंदोलन' करण्यात येईल व विस्थापित आदिवासी बांधव पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करणार असल्याची माहिती भीमकुंडचे सरपंच माणिक गेडाम व उपसरपंच व्यंकटेश सोटपेल्लीवार, किरणताई कोलवते, कृष्णा मारपवार, गजानन मामीडवार यांनी दिली.
विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात सरकार जागरण आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मोहुर्ले, दत्ता गटलेवार, युसूफ खॉं पठाण, मोबीन खान, किरणताई कोलवते, गजानन मामीडवार, नारायण रेड्डीवार, विठ्ठल गावंडे, गणपतराव कन्नलवार, बालू प्रतापवार, बाळासाहेब कन्नलवार, रमेश पाटील, अतुल नगराळे, नाना अगरुलवार, कृष्णा मारपवार, किष्टन्ना मॅकलवार, अशोक मॅकलवार, दत्ता गेडाम, कमल नैताम, किष्टा गोपालवार, गंगाबाई शर्लावार, वासुदेव नैताम, समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, सुरेश बोलेनवार, मनोज मेर्शाम, मोरेश्‍वर वातीले, नितिन कांबळे, नंदू जयस्वाल, शेखर जोशी, प्रितम ठाकूर, संतोष नैताम, भिमराव नैताम यांचा समावेश राहणार आहे.
भीमकुंड येथील पुरग्रस्तांसाठी पंचायत समिती घाटंजीने ऑगस्ट महिन्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, उपविभागीय अधिकार्‍यांनी तो बंद केला आहे. पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सर्व भीमकुंडवासी यवतमाळला जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांना ऑक्टोबर महिन्यात भेटले असता, त्यांनी ८ दिवसात पिण्याचे पाणी देतो असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ५ महिने लोटले तरी पाणी तर सोडा साधा अधिकारीही विचारपूस करण्यासाठी आलेला नाही. उलट भीमकुंडच्या महिलांना २ किमीची पायपीट करून नाल्याचे पाणी प्यावे लागत आहे, अशी माहिती किरणताई कोलवते व कृष्णा मारकवार यांनी दिली. फक्त १२ कुटुंबीयांना सौर कंदील देण्यात आले असून वीजपुरवठा नसल्यामुळे सर्व कुटुंब जंगलात अंधारात राहत असून कोणत्याही वेळी दुर्घटना होऊ शकते. भीमकुंड पूरग्रस्तांना कमीत कमी पाणी, नियमित पट्टे व विजेचा प्रश्न निकाली लावण्यात यावा, अशी मागणी भीमकुंड येथील आदिवासी बांधवांनी केली आहे
गील ऑगस्ट महिन्यात सतत अतवृष्टी व महापुराच्या तडाख्याने विस्थापित झालेल्या व टिपेश्‍वर अभयारण्याच्या पायथ्याशी जावून राहत असलेल्या भीमकुंड येथील आदिवासी बांधवांना सतत ८ महिने आंदोलन करूनही राज्य व केंद्र सरकारने पाणी व विजेपासून वंचित ठेवले आहे. येथे नागरी सुविधांचा अभाव असून त्यांची पुर्तता करावी, अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment