Wednesday, 12 March 2014

केजरीवालांनी शेतकय्रांचा व आदिवासींचा संभ्रम दुर करावा -विदर्भ जनआंदोलन समितीचा आप वर १५ प्रश्नांचा भडीमार


केजरीवालांनी शेतकय्रांचा व आदिवासींचा संभ्रम दुर करावा -विदर्भ 

जनआंदोलन समितीचा आप वर १५ प्रश्नांचा भडीमार

vidarbha 12-3-2014 -
 आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल विदर्भाच्या दौय्रावर येत असुन विदर्भ जन आंदोलन समितीने आम आदमी पार्टीसमोर १५ प्रश्न उपस्थित केले आहेत. आम आदमी पार्टीने पर्यायी राजकीय व्यवस्था व क्रांती करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला तडा जाणारे अनेक निर्णय पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल घेत असुन त्यांचे राजकारण, त्यांची राजकीय निष्ठा, पक्षाचे आर्थिक धोरण व भारतीय लोकशाही व घटनेवर असलेली श्रध्दा याबाबत विदर्भाच्या जनतेत अनेक शंका निर्माण झाल्या असल्याचे विदर्भ जन आंदोलन समितीने म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी विदर्भाच्या दौय्रात या शंकेचे निराकरण करावे याकरिता विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आम आदमी पार्टीवर १५ प्रश्नांची सरबत्ती केली असुन त्यांच्याकडुन यावर खुलासा मागीतला आहे. 
भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर व आपल्या लोकशाही व्यवस्थेवर आपची श्रध्दा आहे का?, अन्न सुरक्षेला विरोध करून तुम्ही गरीबांच्या पोटावर पाय कां देता ?, ग्रामीण भारताला व शेतकय्रांना नागवणाय्रा खुल्या अर्थव्यवस्थेचे आपण समर्थन का करता ?, अन्नात विष कालवणाय्रा जैविक तंत्रज्ञानाला आपली मान्यता का आहे ? ,
 प्रसार माध्यमे विकल्या गेली आहेत असे म्हणत असतांनाच प्रसार माध्यमांसोबत सेटींग करून आपण प्रसिध्दी मिळविता हे लोकांची दिशाभुल करण्याचा प्रकार नाही का?, असा सवाल विदर्भ जनआंदोलन समितीने उपस्थित केला आहे.यासोबत समितीने आणखीही काही प्रश्नांवर भर दिला असुन त्यांनी आपला 
मोठ्या सिंचन प्रकल्पाबाबत आपची भुमिका संदिग्ध का आहे?अशी विचारणा केली आहे.आरक्षण मुद्यावर विचारतांना विदर्भ जनआंदोलन समितीने आपच्या या भुमिकेलाही कैचित पकडले आहे. आरक्षणाबाबात आपची भुमिका तळ्यात - मळ्यात का? असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे. आदिवासींच्या जमिनी मातीमोल किमतीत घेवुन कोट्यावधींची संपत्ती जमा करणाय्रा आपच्या नेत्यांबाबत गप्प का ? असा थेट प्रश्न त्यांनी अरविंद केजरीवाल यांचेसमोर उपस्थित केला आहे. 
१० हजार रूपये घेवुन श्रीमंतांसोबत भोजन घेणे आम आदमीच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्राकार नाही का ?
 आपण लोकशाहीच्या गप्पा करता पक्ष मात्र हुकुमशाहीने चालविता हे कसे ? अशी विचारणाही विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांचेकडे केली आहे. तसेच भारत टोलमुक्त व्हावा याबाबत आपली भुमिका काय ?, अवैध धंदा करणारे, दारू विकणारे, जमिन माफीया हे आप पक्षाचे सर्वेसर्वा कसे? आपण शासकीय बंगला व सुरक्षा घेणार नाही हे सांगीतले होते आता मात्र दोन्ही गोष्टी सोडावयास आपण तयार नाही हे कुठल्या तत्वात बसते ? असेही विदर्भ जनआंदोलन समितीने म्हटले आहे. आपण आम आदमीच्या गप्पा करता मात्र राष्ट्रीय स्तरावर व गावोगावी आपले नेते मात्र खास आहेत असा विरोधाभास कसा ? कुठलीही जबाबदारी न घेता लोकांवर बेछुट आरोप करणे व देशात अराजक माजविणे हा आपला एककलमी कार्यक्रम आहे का ? असाही प्रश्न किशोर तिवारी यांनी उपस्थित केला असुन अरविंद केजरीवाल यांनी चंद्रपुर, व नागपुरच्या जनसभेत यावर खुलासा करावा अशी नम्र विनंती सुध्दा किशोर तिवारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment