Monday, 10 March 2014

केजरीवाल आदश्रांनाच देताहेत मूठमाती - बी.टी. बियाणांचे खुले सर्मथन करणारे, खुल्या अर्थ व्यवस्थेसाठी लढा देणारे व गरिबाला अन्न देऊ नका, यासाठी आंदोलन करणारे अँड. वामनराव चटप हे आम आदमी पार्टीचे उमेदवार कसे-किशोर तिवारी

केजरीवाल आदश्रांनाच देताहेत मूठमाती - बी.टी. बियाणांचे खुले सर्मथन करणारे, खुल्या अर्थ व्यवस्थेसाठी लढा देणारे व गरिबाला अन्न देऊ नका, यासाठी आंदोलन करणारे अँड. वामनराव चटप हे आम आदमी पार्टीचे उमेदवार कसे-किशोर तिवारी

ॅ स्थानिक प्रतिनिधी/यवतमाळ

शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भात झाल्या असताना आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल विदर्भात स्वतंत्र भारत पक्षाच्या उमेदवाराला प्राधान्य देऊन आपल्या आदश्रांनाच तिलांजली देत असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. त्यांनी आपचे चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आ. वामनराव चटप यांना उमेदवारी कशी दिली,असा आक्षेपही नोंदविला आहे.
'डंकेल करार झाला व बळीराजा मुक्त झाला', अशी भूमिका घेत संपूर्ण शेतकर्‍यांचे आंदोलन शरद जोशी यांनी चालविले. मात्र खुली बाजारव्यवस्था व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातातील पुनरागमनासाठी शरद जोशी हेच कारण आहेत. त्यांच्या स्वतंत्र भारत पक्षाच्या उमेदवाराला आम आदमी पार्टीने आपले जैविक बियाणे, खुली अर्थव्यवस्था व गरिबाला अन्न सुरक्षा हे मूलभूत धोरण बाजूला सारून उमेदवारी दिली आहे. ज्या विदर्भाच्या लोकसभेच्या मतदारसंघात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या, त्या ठिकाणी आपने उमदेवारी देऊन विदर्भाच्या शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. याबाबत विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल व डॉ. प्रशांत भूषण यांना पत्र लिहून आपण एकीकडे बी. टी. बियाण्यांचा विरोध करण्यासाठी व जैविक बियाण्यांचा भारतात वापर थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात १५ वर्षापासून लढत आहोत, मात्र राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदा आपण सत्तेच्या जवळ जाण्यासाठी जीवनाच्या मूल्यांना व आदश्रांना मूठमाती देत असल्याचा अनुभव मला येत असल्याचा आरोप केला आहे. कारण देताना चंद्रपूर, केळापूर, वणी या लोकसभा मतदारसंघात बी.टी. बियाणांचे खुले सर्मथन करणारे, खुल्या अर्थ व्यवस्थेसाठी लढा देणारे व गरिबाला अन्न देऊ नका, यासाठी आंदोलन करणारे अँड. वामनराव चटप हे आम आदमी पार्टीचे उमेदवार कसे, असा सवाल या नेत्यांना विचारण्यात आला.


 अँड. वामनराव चटप यांना मागील निवडणुकीत विदर्भ जनआंदोलन समितीने संपूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र त्यांना विशिष्ट जातीचेच मतदान झाले होते. मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी विधवा बेबीताई बैस यांना पाठिंबा देऊन अँड. वामनराव चटप यांनी आपल्या विशिष्ट जातीच्या उमेदवाराचा प्रचार केला, हा इतिहास आहे. अँड. वामनराव चटप यांनी लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मागील ५ वर्षात कोणत्याही सामाजिक व गरिबांच्या प्रश्नांकडे ढुंकू नही पाहिले नाही. संपूर्ण कृषीव्यवस्था व आत्महत्याग्रस्त शेतकरी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गुलाम करण्यासाठी गरिबांना अन्नापासून वंचित करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला खासदार करायचे काय? असा सवालसुद्धा किशोर तिवारी यांनी अरविंद केजरीवाल विचारला आहे. आम आदमी पार्टीमध्ये चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक युवा नेते शेतकरी गरिबांसाठी भांडत आहेत. तर समाजाच्या तळागाळासाठी काम करणारे चंद्रपूरचे पर्यावरण वाचविण्यासाठी लढा देणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली असताना भाड्याच्या उमेदवाराला लढवणे आम आदमी पार्टीला तोट्याचे होईल, अस्सा सल्लाही त्यांनी केजरीवाल यांना दिला. प्रामाणिक कार्यकर्त्यांला उमेदवार करावे, अशी अपेक्षा किशोर तिवारी यांनी केली आहे 

No comments:

Post a Comment