Friday, 22 November 2013

नागपुरात हजारो कोटीचे फसवणुकीचे दुष्टचक्र सुरूच -वासनकर कंपनीच्याआर्थिक कारभाराची चौकशी करा -किशोर तिवारी


नागपुरात हजारो कोटीचे फसवणुकीचे दुष्टचक्र सुरूच -वासनकर कंपनीच्याआर्थिक कारभाराची  चौकशी करा -किशोर तिवारी
नागपूर -२३ नोव्हेंबर २०१३

नागपूर येथे अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात एकट्या नागपूर शहरातअग्रवाल, मंचलवार, झामरे दाम्पत्य आणि जोशी दाम्पत्याने सुमारे १0 हजारगुंतवणूकदारांचे पाच हजार कोटी रुपये गिळंकृत केले. अशाच प्रकारे आणखी काही कंपन्यांची गिळंकृत सुरूच आहे.त्यातीलच वासनकर कंपनीचे  बिंग आता फुटण्याच्या तयारीत आहे.दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या या कंपनीच्या कार्यालयात आज सायंकाळी काही गुंतवणूकदारांनी संचालकाच्या नावे शिमगाही केला असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर (सोबत बातमीचे कात्रण जोडले आहे ) ,विदर्भ जनांदोलन समितीने या वासनकर कंपनीचे काही गुंतवणूकदारांशी  संपर्क  करून  चौकशी
केली असता सारेच नियम व कायदे धाब्यावर ठेवून २४ महिन्यात दामदुप्पट करण्याच्या गोरखधंदा प्रशांत वासनकर करीत असून आता या  प्रशांत वासनकर आर्धिक मंदीचे कारण समोर करीत  या महिन्यापासून पैसे परत देणे बंद केले आहे यामुळे महाराष्ट्र सरकारने वेळीच कारवाई करावी अशी विनंती ,विदर्भ जन आदोलन  समितीचे नेते किशोर तिवारी केली आहे .
नागपूर येथील मराठी वृतपत्र लोकमतमध्ये म्हटले आहे कि नागपुरात आणखी एक कंपनी दिवाळखोरीकडे अग्रसर होत असून ,हे  फसवणुकीचे दुष्टचक्र आणखी सुरूच राहणार  याचे संकेत दिले आहेत मात्र  सर्व  राजकीय नेते पोलीस व मिडिया सारेच मूकदर्शक झाले असून पोळा फुटण्याच्या सरकारने कारवाई करावी कारण प्रशांत वासनकर यांनी आर्थिक सल्लागार किंवा इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या नावाखाली गोळा  केलेली  सारी संपती कोणतीही सरकारी परवानगी केलेली नाही व काळ्या पैशाच्या राजरोसपणे खुला २४ महिन्यात दामदुप्पट करण्याच्या गोरखधंदा  फारच भयंकर असून असा प्रकार २३ वर्ष चालत आहे व सरकारी अधिकारी झोपले आहेत याकडे निवेदनात  विशेष लक्ष देण्यात  आले आहे . आपण  हे निवेदन दामदुप्पटीच्या लोभाने  प्रशांत वासनकर यांच्याकडे गुंतवणूकदारांशी  संपर्क  करून  व  'पोस्टडेटेड चेकसह पुरावे ठेवूनंच करीत असल्याचे म्हटले आहे व यामागे प्रशांत वासनकर यांनी पैसा परत करावा हाच प्रामाणिक प्रयास असल्याचे  म्हटले आहे व आरोप खोटे असल्यास प्रशांत वासनकर यांनी आमच्यावर  फोजदारी कारवाई करावी असे आवाहनही  करण्यात  आहे.नागपूरच्या लोकमतने  वासनकर कंपनीच्या नाव  न घेता  खालील बातमी प्रकाशीत केली आहे ती अशी

====================


आणखी एक कंपनी दिवाळखोरीकडे..-फसवणुकीचे दुष्टचक्र : सारेच मूकदर्शक-लोकमत विशेष

http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=11/19/2013&pageno=1&edition=21&prntid=13464&bxid=27356546&pgno=1


http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=11/19/2013&pageno=2&edition=21&prntid=13465&bxid=27725642&pgno=2■ नागपूर

प्रमोद अग्रवाल, हरिभाऊ मंचलवार, जयंत आणि वर्षा झामरे, समीर आणि पल्लवी जोशी या ठगबाजांपूर्वी अमन आणि राजश्री हेमानी अन् .. अन् .. आता कोणती कंपनी किंवा कोणता ठगबाज गुंतवणूकदारांना वाकुल्या दाखवणार, असा धस्स करणारा प्रश्न लाखो नागपूरकरांना पडला आहे. या प्रश्नामागचे कारणही सबळ आहे. आर्थिक सल्लागार किंवा इन्व्हेस्टमेंटकंपन्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या नागपुरातील अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीचे 'घबाड'कधीही बाहेर येऊ शकते. कोणत्याही दिवशी पोलीस या कंपनीच्या

संचालकावर कारवाई करू शकतात आणिया कंपनीमध्ये आपली आयुष्यभराची मिळकत गुंतविणार्‍या हजारो गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा आक्रोश तीव्र होऊ शकतो. आपल्या आणि परिवाराच्या आवडीनिवडी, भावनांना मुरड घालून पै-पै जोडणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. मुला-मुलींचे शिक्षण, रोजगार, त्यांचे लग्न आणि जमलेच तर थकत्या काळात हक्काचे चांगले घर बनविण्याचे स्वप्न त्यामागे असते. भविष्याच्या स्वप्नपूर्तीची कोंडी होऊ नये म्हणून ही मंडळी आपल्या भावभावनांची वर्तमानात कोंडी करतात. कुणीतरी नात्यागोत्यातील व्यक्ती त्यांना गाठतो. जवळच्या व्यक्तीची कंपनी आहे. आकर्षक परतावा मिळतो. हजारो जण त्याचा लाभ घेत आहेत. तुम्ही काय पैशाचे लोणचे घालणार, असा प्रश्न करतो. विश्‍वास बसावा म्हणून 'पोस्टडेटेड चेक, करारनामे, प्रॉमिसरी नोट' अगदी स्टॅम्पपेपरवर लिहून मिळतात, असे सांगितले जाते. संबंधित व्यक्तीची रक्कम आपल्याकडे वळती करून घेण्याची अर्थात फसवणुकीची ही पहिली पायरी असते. दामदुप्पटीच्या लोभाने ती अनेकजण चढतात. प्रारंभी तुटपुंजी रक्कम गुंतवतात. दोन-चार महिन्यातच जवळचा व्यक्ती त्याच्या व्याजाचा धनादेश घेऊन त्याच्याकडे पोहोचतो. ५0 हजारांचे चार महिन्यातच ६0 हजार झाल्याचे सांगून, ही रक्कम आणि आणखी लाख-दोन लाख गुंतविण्याचा सल्ला मिळतो. पुन्हा काही दिवसानंतर रक्कम दीडपट झाल्याचे
सांगून धनादेश दाखविला जातो. 'कोण बनेंगा करोडपती'मधील अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे धनादेश दाखवतो,तसे धनादेश पाहून गुंतवणूकदार मनोमन स्वप्नांचे इमले चढवतो आणि आपल्या जवळची सर्वच्यासर्व रक्कम दलालाच्या, संचालकाच्या घशात कोंबतो. कुणी नवृत्ती वेतनाची तर कुणी प्लॉट, सदनिका घर
विकून आलेली सारीच्यासारी रक्कम गुंतवितो.

 अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात एकट्या नागपूर शहरात अग्रवाल, मंचलवार, झामरे दाम्पत्य आणि जोशी दाम्पत्याने सुमारे १0 हजार गुंतवणूकदारांचे पाच हजार कोटी रुपये गिळंकृत केले. अशाच प्रकारे आणखी काही कंपन्यांची गिळंकृत सुरूच आहे. त्यातीलच एका कंपनीचे बिंग आता फुटण्याच्या तयारीत आहे. दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या या कंपनीच्या कार्यालयात आज सायंकाळी काही गुंतवणूकदारांनी संचालकाच्या नावे शिमगाही केला. त्याच्या तक्रारी, बोंबाबोंब झाल्यावर पोलीस कारवाई करतील. त्यांना कारागृहात डांबतील, मात्र त्यातून गुंतवणूकदारांचे हीत साधले जाणार नाही.

कळीचा प्रश्न

पोलिसांकडे गुप्तचर यंत्रणा असते. विशेष शाखा आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात खुपिया पोलीस कर्मचारी असतात. त्यांना फसगत करणार्‍या कोणत्याच कंपनीची आगावू माहिती मिळू नये, ही आश्‍चर्याची बाब आहे. संशय आल्यास रस्त्यावरून पायदळ किंवा साध्या दुचाकीने जाणार्‍यांची पोलीस नको त्या पद्धतीने चौकशी करतात. हजारो नागरिकांची फसगत करणार्‍यांचा पोलिसांना कधीच संशय येत
नाही, हा कळीचा प्रश्न आहे
==============================
महाराष्ट्र सरकारने वेळीच कारवाई करावी अशी विनंती ,विदर्भ जन आदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केली आहे .

No comments:

Post a Comment