Friday, 8 November 2013

नापिकीग्रस्त शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून लूट-आत्महत्यांचे सत्र सुरूच -लोकमत


नापिकीग्रस्त शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून लूट-आत्महत्यांचे सत्र सुरूच -लोकमत 

पणन व नाफेडची खरेदी एक थोतांड :  विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप: ज्या महाराष्ट्रात कापूस खरेदी करण्यासाठी कमीत कमी चार हजार कोटींची तरतूद करून सर्व संकलन केंद्र सुरू करून पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केल्याशिवाय शेतकर्‍यांची लूट थांबणार नाही, हे सत्य असताना राज्य सरकारने पणन महासंघाला फक्त ४0 कोटी रुपये देवून ४00 संकलन केंद्रांपैकी १0 संकलन केंद्र सुरू करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले असून पणन महासंघाची खरेदी थोतांड आहे. सोयाबीनची नाफेडची खरेदीसुद्धा हमीभावापेक्षा कमी भावात आद्रतेचे कारण दाखवून करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या मालाला कमी भाव तर व्यापार्‍याच्या मालाला हमी भाव असा गोरखधंदा सर्वत्र सुरू असल्याची टिकासुद्धा तिवारी यांनी केली

यवतमाळ : ऐन दिवाळीत पश्‍चिम विदर्भातील सात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर मागील ४८ तासात पुन्हा सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. नापिकी व कर्जाच्या बोझाखाली नैराशाला तोंड देत असलेल्या शेतकर्‍यांच्या कापूस व सोयाबीन या पिकाला व्यापारी तांत्रिक कारणे दाखवून हमी भावापेक्षाही कमी भावात खरेदी करीत आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. हमी भावात शेतमाल खरेदी करणार्‍या शासकीय यंत्रणा सुस्त असल्यामुळे आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 
पश्‍चिम विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील भोराड येथील सोपान झोरे, दलपतपूर येथील विनोद बदल व नादगाव (भोर) गणपत इकार , यवतमाळ जिल्ह्यातील बेलखेड येथील साहेबराव ठाकरे, कोठारी येथील मेरचंद राठोड व अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील विनोद लेवटे,रायपुर -मोर्शी येथील श्रीकृशन मानेकर     व पिंपरी येथील मोहन असवार या आठ  शेतकर्‍यांनी मागील  ७२ तासात मृत्यूला कवटाळले आहे. संपूर्ण विदर्भात कापूस व सोयाबीनचे पीक अपेक्षेपेक्षा ५0 टक्के कमी झाले आहे. 
बाजारामध्ये शेतकरी कापूस व सोयाबीन विक्रीला घेऊन जातो. त्यावेळेला व्यापारी वर्ग सोयाबीनचा भाव एक हजार ते तीन हजार ५00 रुपये तर कापसाचा भाव दोन हजार ते चार हजार रुपये या प्रमाणे लावत आहे. पाण्यामुळे सोयाबीन व कापसाची गुणवत्ता घसरल्याचा बेबनाव करून व्यापारी वर्ग शेतकर्‍यांच्या मालाला भाव देत असताना टाळाटाळ करीत आहे. विशेष म्हणजे भावाबाबत शेतकर्‍यांनी विरोध केला तर व्यापारी व दलाल त्यांचा माल घरी घेवून जाण्याच्या धमक्या देतात. 
सरकारने शेतकर्‍यांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसून घोषित केलेल्या तीन हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजमधील खडकूही शेतकर्‍यांना मिळाला नाही. नैराश्यग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या सरकारच्या उदासीन धोरणामुळे होत असून सरकारने कापसाचा हमीभाव सहा हजार रुपये तर सोयाबीनचा हमीभाव पाच हजार रुपये करावा, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

पणन व नाफेडची खरेदी एक थोतांड : आरोप ■ ज्या महाराष्ट्रात कापूस खरेदी करण्यासाठी कमीत कमी चार हजार कोटींची तरतूद करून सर्व संकलन केंद्र सुरू करून पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केल्याशिवाय शेतकर्‍यांची लूट थांबणार नाही, हे सत्य असताना राज्य सरकारने पणन महासंघाला फक्त ४0 कोटी रुपये देवून ४00 संकलन केंद्रांपैकी १0 संकलन केंद्र सुरू करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले असून पणन महासंघाची खरेदी थोतांड आहे. सोयाबीनची नाफेडची खरेदीसुद्धा हमीभावापेक्षा कमी भावात आद्रतेचे कारण दाखवून करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या मालाला कमी भाव तर व्यापार्‍याच्या मालाला हमी भाव असा गोरखधंदा सर्वत्र सुरू असल्याची टिकासुद्धा तिवारी यांनी केली

No comments:

Post a Comment