Tuesday, 29 October 2013

केंद्राच्या पॅकेजवरून विदर्भाच्या अतिवृष्टीग्रस्तांमध्ये असंतोष- अपुऱ्या मदतीमुळे शेतक ऱ्यांमध्ये संताप=लोकसत्ता

केंद्राच्या पॅकेजवरून विदर्भाच्या अतिवृष्टीग्रस्तांमध्ये असंतोष- अपुऱ्या मदतीमुळे शेतक ऱ्यांमध्ये संताप=लोकसत्ता प्रतिनिधी, नागपूर
Published: Tuesday, October 29, 2013


विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतक ऱ्यांसाठी केंद्राने जाहीर केलेली ९२२ कोटी रुपयांची मदत अपुरी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतक ऱ्यांमध्ये उमटली असून यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून संपूर्ण विदर्भात साजरी केली जाणार आहे. ज्या प्रमाणात अतिवृष्टीपायी शेती, संपत्ती, पाळीव पशू, पिके आणि शेतजमिनीचे नुकसान झाले त्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे मदत देण्याऐवजी केंद्र सरकारने शेतक ऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना आहे. 
ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्र्यांनी १९३४ कोटींचे पॅकेज विदर्भासाठी घोषित केले होते. या पॅकेजमधील मदत अद्यापही शेतक ऱ्यांना मिळालेली नाही. त्यांच्या हातात ८० रुपये, १०० रुपयांचे धनादेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. या क्रूर थट्टेमुळे शेतक ऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतक ऱ्यांनी शेते, पिके आणि घरे गमाविली असून ३० लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. परतीच्या पावसाने या पिकांचे नुकसान केले. विदर्भात ४२ लाख एकरातील खरिपाच्या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात त्वरित वाढ करण्याचीही मागणी समोर आली आहे. कापसाला ६ हजार रुपये प्रती क्विंटल तर सोयाबीनला ५ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याचा आग्रह शेतक ऱ्यांनी धरला आहे. 
विदर्भातील लाखो एकर शेतजमीन खरडली गेली असून २० हजार कोटींचे नुकसान झाल्याची आकडेवारी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी एका पत्रकातून सादर केली आहे. एवढी हानी झाल्यानंतरही राज्य सरकार आणि केंद्राने फक्त २८०० कोटींचीच मदत जाहीर केल्याने आधीच खचलेल्या शेतकऱ्याला भीक मागण्याची पाळी येईल, असा इशारा तिवारी यांनी दिला. 

शेतीच्या नुकसानी व्यतिरिक्त पूल, रस्ते यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीत कपात करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी केला. राज्य सरकारकडे अद्यापही शेतीच्या नुकसानीचे अंतिम विवरण सादर झाले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १ जुलै २००६ रोजी विदर्भासाठी ३७५० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. परंतु, त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

Wednesday, 23 October 2013

दिवाळीच्या तोंडावर विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र-आतापर्यंत ६७१ शेतक ऱ्यांचा मृत्यू-loksatta

दिवाळीच्या तोंडावर विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र-आतापर्यंत ६७१ शेतक ऱ्यांचा मृत्यू

http://www.loksatta.com/vruthanta-news/farmer-suicide-continues-on-diwali-face-in-vidarbha-231023/


विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत वाढतच आहे. गेल्या दोन दिवसात आणखी तीन शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत हा आकडा ६७१ पर्यंत पोहोचला आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. 


विदर्भात झालेल्या आत्महत्या
वर्ष आत्महत्या
२००१ - ५२
२००२ - ०४
२००३ - १४८
२००४ - ४४७
२००५ - ४४५
२००६ - १४४८
२००७ - १२४६
२००८ - १२६८
२००९ - ९१६
२०१० - ७४८
२०११ - ९१८
२०१२ - ९१६
२०१३ - ६७१
यवतमाळ जिल्ह्य़ातील बोरगाई येथील शेतकरी कैलास दुधाडे, वर्धा जिल्ह्य़ातील वेला येथील ओमदेव सुपारे आणि सिरसगाव येथील अशोक खाकाते हे अलीकडील काळातील बळी ठरले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे विदर्भातील लाखो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून हजारो एकर जमीन खरडून गेली आहे. अशा जमिनीत पुढील काही वर्षे पीक येणार नाही, एवढे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या पंधरवडय़ात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू असताना विदर्भात १३ शेतक ऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्या. विजयादशमी सणादरम्यान आठ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या. कापूस आणि सोयाबीन पिकांची अधिक क्षेत्र असलेल्या पश्चिम विदर्भातच अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. झालेल्या आत्महत्यांची सत्यता पडताळून पाहणी यंत्रणा अस्तित्वात नसताना प्रशासन या आत्महत्या अपघाती मृत्यू, दारू पिण्याने किंवा घरगुती कारणाने झाल्याचे दाखवित आहे, असा आरोप समितीने केला आहे. राज्य आणि केंद्र सरकार शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अतिवृष्टी शेतक ऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देण्याच्या आश्वासनाचा दोन्ही सरकारांना विसर पडला आहे. राज्य व केंद्राकडून अजूनही शेतक ऱ्यांना मदत पुरविण्यात आलेली नाही.

सुरुवातीला विदर्भात झालेल्या नुकसानीमुळे कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचे ५० टक्के नुकसान झाले होते. मात्र सोयाबीनला शेंगा व कापसाला बोंडे फुटल्यामुळे शेतक ऱ्यांना उत्पादनाची थोडी आशा होती. परतीच्या पावसाने विदर्भात १० लाख एकरामधील पिकांचे नुकसान केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिवृष्टीग्रस्त विदर्भाचा दौरा केल्यानंतर जाहीर केलेली २ हजार कोटी रुपयांच्या मदतीतून एक पैसाही आतापर्यंत शेतक ऱ्यांना मिळालेला नाही, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

Saturday, 19 October 2013

Five more farmers end lives in Vidarbha-DNA

Five more farmers end lives in Vidarbha

Sunday, Oct 20, 2013, 6:45 IST | Place: Mumbai | Agency: DNA

Five farmers ended their lives in the last 24 hours in west Vidarbha, while eight
others from the same region committed suicide during the recently concluded Dusshera festival.
The suicides have taken the death toll to 668 in Vidarbha, although sources at the divisional commissioner’s office admit that the actual death toll may be much higher.

Drought and incessant rains have seen repeated crop loss in the region, leaving many distressed farmers in huge debt. Chief minister Prithviraj Chavan, who announced a relief package of Rs 2,000 crore, and union agriculture minister Sharad Pawar’s visits to the region have not provided any relief to the farmers, as the aid that was promised is yet to reach them.
Despite special packages, like the PM’s Rs3,750-crore package, the suicides haven’t stopped.
The deaths were reported in Boregoan village, Punwat village in Yavatmal and Amala village in Wardha amongst others.
“The government needs to look at this problem in a holistic socio-economic  manner. Right now, the approach is simply crisis management and that too is not being done properly,” pointed out activist Kishore Tiwari of the farm rights advocacy group Vidarbha Jan Andolan Samiti. “Dussehra went by with no relief and now, it looks like the farmers are staring at a black Diwali this year while bureaucrats, politicians and officials of the agro MNCs who have achieved their ‘targets’ will be celebrating.” Repeated attempts to speak to the relief and rehabilitation minister Patangrao Kadam were unsuccessful.

Toll this year is 668
The deceased in the recent incidents    include Mahadeo Mahakulkar of Boregoan village and Mahadeo Paikhan of Punwat village in Yavatmal, Vishnu Mahadeo Satpute of village Amala in Wardha, Rambhau Bonde of Rantapur village in Amaravti and Sampat Jinda Lore of Wadner village in Amaravati, amongst others.
==================================