Monday, 15 July 2013

Maharashtra report Two Starvation Death making mockery of UPA'S Govt. food security

Maharashtra report Two Starvation Death making mockery of UPA'S Govt. food security 
Nagpur-15th July 2013
Nagpur Marathi daily  "LOKSHAHIVARTA" published main story which is much more shocking and disturbing regarding starvation death of " mother and daughter' in agrarian crisis driven Vidarbha in village kunad in lakhandur taluka of bhandara district represented by high profile union cabinet minister Praful Patel which went unnoticed till highly decomposed bodies got cremated and admistration is till not aware such starvation death which much more irritating,
here is the report 
http://epaper.lokshahivarta.in/epapermain.aspx#
========================
एरवी त्यांच्या मरणाची 'बातमी' झाली नसती. कारण त्यांचे जगणेही जगाच्या दृष्टीने दखलपात्र नव्हते. मात्र, अनेक दिवस अन्नाचा एक कणही मिळाला नाही म्हणून तडफडून तडफडून त्यांनी प्राण सोडला.. गावाबाहेर शेतात असलेल्या-ज्याला झोपडीही म्हणता येणार नाही कशातरी विटांवर विटा रचून चार भिंतींच्या आडोशात कुजून पडलेल्या त्या माय-लेकींच्या मृतदेहाच्या दुर्गंधीने रविवारी त्यांच्या मरणाची दुर्दैवी वार्ता जगाला सांगितली.
देशभरातील भूकेल्यांचे पोट भरण्यासाठी आलेल्या अन्न सुरक्षा विधेयकासाठी मुहूर्त शोधला जात असताना त्यांचा भूकबळी गेला. 'गावात कुणी उपाशी आहे का ते बघून घ्यावे अन् मग गावाने जेवावे', अशी महाराष्ट्रातल्या गावांची प्रथा होती. असे गाव शेजारी होते. माणसांची वर्दळ होती. देव होता, देश होता आणि धर्मही..तरीही.. तरीही त्यांना खायला मातीही नव्हती!
पंच्याहत्तरीच्या शेवंता हरी तोंडरे आणि पस्तिशीची गुणा हरी तोंडरे या समाजानं पोरक्या केलेल्या माय-लेकींचा मृत्यू नैसर्गिक नाहीच. तो निर्घृण खूनच आहे. कुणी केला? शेती विकायला लावून शेतात एकाकी सोडून देणार्‍या मोठय़ा लेक-जावयाने?.. त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करणार्‍या व त्यांच्या भूकेची आर्त साद ऐकू न शकलेल्या मुक्या-बहिर्‍या गावाने की निब्बर समाजाने? 
पोलिसांनी आता त्यांच्या मरणाची दखल घेतली आहे. चौकशी सुरू आहे.. काय येणार हाती? शेवंता ही मूळची दोनाड गावातील रहिवासी होती. आपल्या मुलीसह दहा वर्षांपूर्वीकर्‍हांडला येथे आली होती. शेवंताने आपल्या मोठय़ा जावयाच्या सांगण्यावरून मुलगा असताना मूळ गाव दोनाड येथील शेतीची विक्र ी केली. मोठा जावई व मुलीच्या सांगण्यावरून कर्‍हांडला येथे जागा खरेदी करून बांधलेल्या झोपडीत ती आपल्या गुणा नामक दुसर्‍या मुलीसह वास्तव्यास होती. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने मागील काही वर्षांपासून मोलमजुरी करून या मायलेकींचा उदरनिर्वाह सुरू होता. मायलेकींना आजार, गरिबी, आर्थिक व शारीरिक संकटांना सामोरे जावे लागले. एकदा 'सौदा' झाल्यावर जावयासह मुलीनेसुद्धा या दोघींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दीनवाण्या अवस्थेत त्या जीवन जगत होत्या. वादळी पावसाने त्यांच्या झोपडीचे छतदेखील उडाले होते. दोघीही आजारी, झोपडीत पाणीच पाणी, छतही उडालेले अन् अंगात जोर नाही. मग मजुरीही नाही..अन्न-पाण्याविना माणूस म्हणे सात दिवस तरी तग धरतो. त्या तडफडून मेल्या अन्नाविना. म्हणजे किती दिवस त्यांनी भुकेजले काढले असतील? किती दिवसांअगोदर त्यांनी जीव सोडला असेल? माहीत नाही. घर गावाबाहेर असल्याने कोणाचे लक्षसुद्धा गेले नाही, असे म्हणतात. त्यांच्या मरणाच्या हाका वादळवार्‍यात विरल्या असतील. त्यांचे अर्शू पावसाच्या सरीत दिसलेच नसतील कुणालाच! 
शेवंता आणि गुणा आता नाहीत या जगात. त्यांच्या प्रेताचे ओझे वाहून नेण्याची ताकद, कुवत अन् नैतिकता या देशातच नाही!
बरेच दिवस भुकेने व्याकूळ
मरून गेल्या माय-लेकी
गाव म्हणेल आता..
असेच झाले असे नाही,
पण, असे झाले असू शकते!

===========================
UNQUOTE
we are moving NHRC as this is case of human right violation as Maharashtra Govt. has failed to provide food security ,nearly 5 million families under below poverty line are denied the food security as state is giving food security to poor as per survey done 1997 and till date even after apeax court has given direction Maharashtra failed to implement food control order 2001 ,informed Kishore Tiwari of Vidarbha Jandolan Samiti (VJAS) after verifying facts .
'We have moved human right commission NHRC as UPA Govt. at the center and PDF Govt. in maharashtra are beating drum over food security bill and people are dying without food ,this is matter of national shame"Tiwari added.
===========================================  

No comments:

Post a Comment