Tuesday, 9 October 2012

सिचन घोटाळ्याची चौकशी ही धूळफेक-करोडो खाणारया राजकीय नेते व कंत्राटदारांवर कारवाई करा -विदर्भ जनआंदोलन समितीची मागणी -तरुणभारत
सिचन घोटाळ्याची चौकशी ही धूळफेक-करोडो खाणारया राजकीय नेते व कंत्राटदारांवर कारवाई करा -विदर्भ जनआंदोलन समितीची  मागणी -तरुणभारत 


http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012-10-10/ampage12_20121010.htm


तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ९ ऑक्टोबर

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या नेतृत्वात विदर्भ सिचन महामंडळाच्या सिचन घोटाळ्यात गुंतलेल्या ४५ अधिकारयांच्या चौकशीचे आदेश ही एक धूळफेकच आहे. ज्या नंदकुमार वडनेरे समितीच्या अहवालात कंत्राटदारांना काम न करता कोट्यवधींची खैरात ज्यांच्या सहीने देण्यात आली. असे नेते अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई का करण्यात येत नाही असा सवाल शेतकरयांच्या प्रश्नासाठी झटणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

३७ प्रकल्पांना मंजुरी देत निवडणुकीच्या तोंडावर कायदा मोडून वाटलेली खैरात याचे सर्व खापर त्यावेळचे कार्यकारी संचालक डी. पी. शिर्के यांच्या माथी मारण्यात आल्याचा ठपका वडनेरे समितीने ठेवला आहे. सिचन घोटाळ्याला चौकशीची चादर टाकून झाकण्याचा प्रयत्न आहे, असाही आरोप तिवारी यांनी केला आहे. सिचन घोटाळ्याच्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी करणारया एच. टी. मेंढेगिरी समितीमध्ये चर्चेत असलेले संग्रहित छायाचित्र मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या संदर्भात जो भ्रष्टाचार झाला आहे तो छायाचित्रांसह जगजाहीर केला आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा व निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या निधीमध्येसुद्धा व कामाच्या गुणवत्तेमध्ये कंत्राटदारांनी अधिकारयांना सोबत घेऊन तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांची मान्यता होती असे दस्तावेज उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असलेले सर्व राजकीय नेते व कंत्राटदार यांना सोडून सिचन घोटाळ्याची कोणतीही चौकशी म्हणजे एक थोतांडच असणार आहे. सनदी अधिकारयांमार्फत ही चौकशी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार काही साध्य करु शकणार नाही, असे तिवारी यांचे मत आहे.
सिचन घोटाळ्यामध्ये राजकीय नेते व कंत्राटदार यांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत विशेष चौकशी समिती नियुक्त करून जगाला सत्य सांगावे, असेही आवाहन त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केले आहे.
======================================================

No comments:

Post a Comment