Sunday, 7 October 2012

चंद्रपूर दारूबंदी -दारू उद्योजकांकडून ३५ कोटींची लाच - ८0 हजार नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड -आता ३१ डिसेंबरपर्यंत 'अल्टिमेटम'

चंद्रपूर दारूबंदी -दारू उद्योजकांकडून ३५ कोटींची लाच -   ८0 हजार नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड -आता ३१ डिसेंबरपर्यंत 'अल्टिमेटम'
प्रतिनिधी / ६ ऑक्टोबर
चंद्रपूर : 

**मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात दारूबंदीची मागणी रेटून धरली जात आहे. शासनाने दारूबंदी समितीमार्फत अहवाल मागविला. पण अद्यापही अहवाल उघडण्यात आलेला नाही. या अहवालावर चर्चा न करता शासन दारूबंदीकडे दुर्लक्ष करीत आहे. दारूमुळे निर्माण झालेली विकृती समूळ नष्ट करण्यासाठी दारूबंदी मोहिमेला अधिक गती देण्याची गरज आहे. सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत दारूबंदी करावी. ही सरकारला शेवटची तारीख आहे अन्यथा, १ जानेवारीपासून पुन्हा तीव्र आंदोलन करू महिलांच्या आंदोलनाने सरकारला त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा इशारा डॉ. राणी बंग यांनी **


 वाढत्या दारूच्या महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. महिला विधवा झाल्या आहेत. पण दारूबंदी करण्याची बुद्धी सरकारला येत नाही. जिल्ह्यात दारूबंदी न करण्यासाठी सरकारला दारू उद्योजकांनी ३५ कोटींची लाच दिल्याचा खळबळजनक आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला. हे सरकार दारूमुळे आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त करेल? किती महिलांना विधवा करायचे आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा दारूमुक्ती अभियान समितीच्या वतीने डॉ. राणी बंग यांच्या पुढाकारातून आज शनिवार (१ ऑक्टोबर) पासून दारूबंदी आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्याला म्हणजेच 'वचनाला जागा' या आगळया आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आयोजित प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातील कार्यक्रमात ते बोलत होते. 
याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग, र्शमिक एल्गारच्या संस्थापिका अँड. पारोमिता गोस्वामी, जयश्री कापेस, रजनी हजारे यांची उपस्थिती होती. 
यावेळी तिवारी यांनी, सरकारच्या धोरणाचा चांगलाचा खरपूस समाचार घेतला. महिलांनो, दारूबंदीसाठी आता निर्धार करा आणि या सरकारला जागे करा. दारूबंदी झाल्याशिवाय शांत बसू नाक, दारूबंदीसाठी मागे हटू नका, गावात आंदोलन करा, सरकारला गावात बोलवा, असे आवाहन करीत चंद्रपुरातील महिलांच्या आंदोलनामुळे सरकार हादरल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. 
याप्रसंगी डॉ. राणी बंग, अँड. पारोमिता गोस्वामी यांनीही दारूबंदीवर सरकारला चांगलेच धारेवर धरले. दारूबंदीसाठी शासनाने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईपर्यंत जिल्ह्यात दारूदुकानासाठी नवीन परवाने दिले जाणार असा निर्णय घेतला. मात्र, सरकार आणि दारू उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईकांनी या शासकीय समितीची अवहेलना केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याच काळात २२ नवीन परवाने देण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता वचनाला जागलेच पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दारूबंदीवर भूमिका स्पष्ट करावी, दारूबंद करावी नाही तर दारू बंद करणार नाही, असे जाहीरपणे सांगण्याचे धाडस त्यांनी करावे, असे आव्हान अँड. पारोमिता गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 
शासनाने दारूबंदीचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करून तातडीने दारूबंदी करावी, यासाठी जिल्ह्यातील ८0 हजार नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठविले. आयोजित कार्यक्रमादरम्यानच डाकघरात ही पोस्टकार्ड टाकण्यात आली. तत्पूर्वी शेकडो महिलांच्या उपस्थितीत शहरातून गांधी चौक ते प्रियदर्शनी चौक मार्गे रॅली काढून प्रियदर्शनी चौकात विसजिर्त करण्यात  आली 

प्रास्ताविक विजय कोरेवार यांनी केले. आभार प्रवीण चिचघरे यांनी मानले.
     
दिला

No comments:

Post a Comment