Friday, 18 May 2012

आश्रमशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी-लोकमत

आश्रमशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी-लोकमत 
यवतमाळ। दि. १८ (कार्यालय प्रतिनिधी)
आश्रमशाळा ही राजकीय नेत्यांची कुरण बनली आहे. या शाळेच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटले जाते. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक पद्धतीने अंगठय़ाचा ठसा घेऊन उपस्थितीची नोंद घ्यावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून संपूर्ण कारभारावरच नियंत्रण ठेवावे, अशी मागणी विदर्भ जन आंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केली आहे. 
विद्यार्थी व कर्मचार्‍यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने केल्यास २५ टक्के अनुदानात बचत होईल. शाळेच्या जेवणावळीत भांडारघर व प्रत्येक वर्गाचे, विद्यार्थ्यांच्या झोपण्याच्या जागेत २४ तास रेकॉर्डींग सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून केल्यास राज्य शासनाचा अनुदानात मोठय़ा प्रमाणात बचत होईल. 
सध्या राज्यशासन एका विद्यार्थ्यावर प्रतिमाह १२00 रुपये खर्च करते. तर संस्थाचालकांचा प्रति विद्यार्थ्यांवर जेमतेम खर्च होत आहे. दुध, फळ व अंडी असा सकस आहार विद्यार्थ्यांना मिळत नाही. राज्य शासनाने या सर्व गोष्टींना पायाबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिक उपस्थिती तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment