Thursday, 17 May 2012

विदर्भातील दुष्काळाकडे केंद्राचे दुर्लक्ष-लोकसत्ताविदर्भातील दुष्काळाकडे केंद्राचे दुर्लक्ष ; शेतकरी नेत्यांची टीका-लोकसत्ता 
 नागपूर / खास प्रतिनिधी
alt एकूण सहा हजार दुष्काळग्रस्त खेडय़ांपैकी चार हजार खेडी विदर्भात असताना सुद्धा सरकारच्या दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांचा केंद्रबिंदू मात्र फक्त पश्चिम महाराष्ट्राच असल्याने केंद्राकडून मिळणाऱ्या वाटय़ात विदर्भाला काहीच मिळणार नसल्याची टीका आता शेतकरी नेते करू लागले आहेत.राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली आणि दोन हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष मॉन्टेसिंग अहलुवालिया यांनी राज्याला ७०० कोटींच्या मदतीचे पॅकेज तयार केले आहे. या निधीतून फक्त पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांनाच मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने विदर्भाच्या दुष्काळी गावांचे काय असा सवाल विदर्भ जनआंदोल समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केला आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील पीक नष्ट झाले आहे. या भागासाठी पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपयांचे स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. केंद्राची चमू विदर्भाच्या दौऱ्यावर आली होती व त्यांनी त्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. मात्र दुष्काळी भागासाठी केंद्राकडे मदत मागताना राज्य शासनाने विदर्भ आणि मराठवाडय़ातील दुष्काळी भागाकडे केंद्राचे लक्ष वेधले नाही, असा आरोपही तिवारी यांनी केला आहे. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. पण पाच महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांना ही मदत पूर्णपणे मिळाली नाही.
विदर्भात मोठय़ा प्रमाणात पाणी आणि वैरण टंचाई आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर मशीनव्दारे काम करण्यात येत आहे त्यामुळे मजुरांना तेथ कामच मिळत नसल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे. 
=========================================================
       

No comments:

Post a Comment