Tuesday, 1 May 2012

पांढरकवड्यात ४ मे रोजी विदर्भस्तरीय तेंदूपत्ता मजूर मेळावा

पांढरकवड्यात ४ मे रोजी विदर्भस्तरीय तेंदूपत्ता मजूर मेळावा
लोकशाही वार्ता/१मे
यवतमाळ : तेंदुपत्ता मजुरांचे रोजगार हमी योजनेचे कार्ड जमा करून कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. यात सनदी अधिकार्‍यांचा सहभाग असल्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागण्या सरकारदरबारी रेटण्यासाठी तेंदूपत्ता मजुर समितीच्यावतीने ४ मे रोजी पांढरकवडा येथील अग्रसेन भवनात तेंदूपत्ता मजुर मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती तेंदूपत्ता मजुर समितीचे संयोजक व विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली आहे.
या मेळाव्याला र्शमीक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष अँड. पारोमीता गोस्वामी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तुकाराम मेर्शाम, लेतुजी जुनघरे, भीमराव नैताम, अंकीत नैताम, मोहन जाधव, मोरेश्‍वर वातीले, सुरेश बोलेनवार, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, सुनील राऊत आदी मार्गदर्शन करतील. या मेळाव्यात प्रामुख्याने तेंदूपत्ता बोनस वाटपातील मागील चार वर्षातील सर्व तक्रारींवर चर्चा करण्यात येणार आहे. रोहयोच्या वनविभागातील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची जनसुनावणी होणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा या मेळाव्यात ठरविण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी नेते लेतुजी जुनघरे आणि तुकाराम मेर्शाम यांनी दिली.

No comments:

Post a Comment