Saturday, 19 May 2012

विदर्भातील ४ हजार ३00 च्या वर खेड्यात भीषण पाणीटंचाई- लोकशाही वार्ता

विदर्भातील ४ हजार ३00 च्या वर खेड्यात भीषण पाणीटंचाई

 लोकशाही वार्ता/ १९ मे
यवतमाळ : राज्य शासनाने सातारा व सांगली या पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याला ७00 कोटींची मदत दिली जाणार आहे. विदर्भातील ४ हजार ३00 च्या वर खेड्यात भीषण पाणीटंचाई असताना विदर्भातील मंत्री व विरोधी पक्षाच्या चुप्पीमुळे ग्रामीण जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने विदर्भातील कमीत कमी १ हजार कोटिंचे पॅकेज द्यावे, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्रातील भीषाण दुष्काळावर मात करण्यासाठी २ हजार कोटिंची तातडीची मदत मागितल्यानंतर केंद्र सरकारने कृषिमंत्री शरद पवार, वित्तमंत्री प्रणव मुखर्जी , सासंदीय कार्यमंत्री बन्सल व योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिेंग अहलुवालीया अधिकृत घोषणा करण्यासाठी संपूर्ण प्रस्ताव तयार झाला असून यात विदर्भ व मराठवाड्याच्या ७0 लाख हेक्टरमध्ये पावसाने दडी दिल्यामुळे नापिकीला तोंड देत असलेल्या व कर्जबाजारीपणामुळे व नैराश्यामुळे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या जिल्ह्याचा समावेश नसून पंतप्रधानांनी या पॅकेजमध्ये विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र १ हजार कोटीची मदत दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या जिल्ह्यांना केंद्राच्या समितीने भेट देऊन दुष्काळाच्या तीव्रतेची कल्पना केंद्र सरकारला स्वतंत्र अहवालाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने डिसेंबरमध्ये विदर्भ, मराठवाडा, खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील ९0 लाख हेक्टरमध्ये दुष्काळ पडल्यामुळे पिकांची नापिकी झाली आहे व यासाठी २ हजार कोटीच्या मदतीची घोषणा केली होती. मात्र याच महाराष्ट्र सरकारने डिसेंबरमध्ये विदर्भ, मराठवाडा, खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील ९0 लाख हेक्टरमध्ये दुष्काळ पडल्यामुळे पिकाची नापिकी झाली आहे व यासाठी २ हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती, ही मदत पिकाच्या नुकसान भरपाईच्या स्वरुपात शेतकर्‍यांना तत्काळ देण्याचे सरकारने कबुल केले होते. परंतु ५ महिने लोटल्यानंतरही आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने एक दमडीही दिली नाही. सरकारने घोषित केलेल्या मदतीमध्ये दुष्काळामध्ये चारा, पाणी, रोजगार व इतरआवश्यक मदतीसाठी सरकारने कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. आज विदर्भ व मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला असून अंदाजे १२ हजार खेड्यामध्ये पिण्याचे पाण्याचे संकट उपस्थित झाले आहे. तर कुठेही जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. रोजगार हमी योजनेच्या कामावर विदर्भ व मराठवाड्यात जेमतेम २0 हजार मजूर कामावर दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ९0 टक्के कामे मशीनद्वारे ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे.याकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने विदर्भ व मराठवाड्यासाठी १ हजार कोटीचे स्वतंत्र पॅकेज द्यावे,अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment