Friday, 20 April 2012

एकाच रात्रीत विदर्भात तीन शेतक-यांची आत्महत्या-महाराष्ट्र टा.

 एकाच रात्रीत विदर्भात तीन शेतक-यांची आत्महत्या-महाराष्ट्र टा.


* कापसाची नुकसान भरपाई न मिळाल्याने टोकाचे पाऊल*

 पंकज मोहरीरु । चंदपूर 
21 Apr 2012, 0118 hrs IST 
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12761267.cms
कापूस उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई चार महिन्यांनंतरही न मिळाल्याने हताश झालेल्या यवतमाळमधील दोन आणि वाशिममधील एका शेतक-याने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. आत्महत्येपूर्वी एका शेतक-याने 'काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करू नका' असे पत्र लिहिल्याने आणखी खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मासळ येथील गजानन थोरात, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील वडनेर येथील कमलाबाई चव्हाण आणि याच तालुक्यातील कोठोडा गावातील गजानन घोटेकर या तिघांनी वेगवेगळ्या घटनांत गुरुवारी रात्री आत्म्हत्या केली.

हे तिघेही कापूसउत्पादक होते व त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी सांगितले. गेल्या वर्षी निर्यातबंदीमुळे कापसाच्या किमती अचानक ढासळल्यामुळे कापूस उत्पादकांना झालेल्या नुकसानापोटी दोन हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा राज्य सरकारने डिसेंबर २०११मध्ये केली होती. मात्र, त्याला चार महिने लोटल्यानंतरही मदत मिळाली नाही. त्यातच केंद्र सरकारने पुन्हा निर्यातबंदी लागू केल्याने या शेतक-यांनी आत्महत्या केली, असे तिवारी म्हणाले
' ते देश बरबाद करतील' ( गजानन घोटेकर या शेतक-याने आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र)
माझा ट्रॅक्टर जुना होता. त्याच्यासाठी रिपेरिंगला खूप खर्च आला. माझं खातं थकीत झालं, सोनंनाणं विकलं गेलं. मी कर्जबाजारी झालो, माझं ग्रामिण बँकेचं पीककर्ज थकीत झालं. मी बेजार झाल्याने आत्महत्या करत आहे.

माझ्या मुलीचे लग्न मी करू शकलो नाही. माझ्या कुटुंबाला वाचवा. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका व माझ्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका. ते देशाला बरबाद करतील. 

1 comment:

 1. नमस्कार
  वरील विषयीची बातमी वाचून खूप वेदना झाल्या. विशेषतः अशा बातम्या मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांमधून प्रकाशित व्हायला हव्यात परंतु तसे होत नाही.
  मी माझ्या पातळीवर अशा बातम्या आणि शेतकऱ्यांच्या विषयी लेख कृषिदेश नावाच्या ब्लॉगवर लिहित असतो. तुमची संमती घेऊन वरील बातमी जशीच्या तशी
  krishidesh.wordpress.com वर प्रकाशित करतो.

  जय भारत!

  ReplyDelete