Sunday, 1 January 2012

कापसाची आवक २५ टक्क्यांनी घसरली- लोकमतकापसाची आवक २५ टक्क्यांनी घसरली- लोकमत  
यवतमाळ। दि. १ (जिल्हा प्रतिनिधी)
देशात १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंतची कापसाची आवक
वर्ष           भारत            गुजरात                 महाराष्ट्र
२0१0     ११८ लाख        २९ लाख               २८ लाख
२0११     ८८ लाख          ४२ लाख              १४ लाख

देशात यावर्षी १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंत केवळ ८८ लाख कापसाच्या गाठीची आवक झाल्याची अधिकृत माहीत असून गेल्या वर्षी याच दरम्यान १८८ लाख गाठीची आवक झाली होती. बाजारात येणार्‍या कापसाची नोंद ठेवणार्‍या कॉटन कॉरपोरेशन ऑफ इंडियाने हा आकडा प्रसारित केला आहे. राष्ट्रीय स्तरावर कापसाची आवक २५ टक्क्याने कमी होणे देशासाठी चिंतेची बाब आहे.
गुजरातमध्ये २९ लाख तर महाराष्ट्रात १४ लाख गाठींची नोंद झाली असून गुजरातमध्ये विक्रमी ३0 टक्के कमी आवक झाली आहे. महाराष्ट्रात तर ही घट ५0 टक्क्यावर असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे कापसाचा हमीभाव राष्ट्रीयस्तरावर वाढविणे हा एकमेव तोडगा आहे. भारतातील १ कोटीच्यावर कापूस उत्पादक शेतकर्‍यांना झालेल्या नापिकीवर सरकारने गंभीरपणे निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावर्षी भारतामध्ये कापसाचा पेरा सरकारी आकडेवारीनुसारच १२0 लाख हेक्टर क्षेत्रात असून यामध्ये सरकारला ३७५ लाख कापसाच्या गाठीचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र पहिल्याच खरीपाच्या तिमाहीत संपूर्ण भारतात २५ ते ३0 टक्के कापसाची आवक कमी असून अनेक भागात कापसाची प्रचंडनापिकी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ४0 लाख हेक्टरमध्ये कापसाची नापिकी झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. लगतच्या आंध्रप्रदेशनेसुद्धा २0 लाख हेक्टरमधील कापसाचे पीक वाया गेल्याची अधिकृत तक्रार केंद्र सरकारकडे केली आहे.
गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने व पंजाब सरकारने केंद्र सरकारला कापसाचा हमीभाव तत्काळ वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र कापसाचा हमीभाव वाढविला तर गिरणी मालकांचे प्रचंड नुकसान होईल, असा युक्तिवाद करून कृषी मूल्य आयोगाने कापसाचा हमी भाव वाढीव प्रस्ताव थंडबस्त्यात टाकला आहे. यावर पंतप्रधानांनी तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे तिवारी यांनी केली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कापसाच्या नापिकीला महाराष्ट्राच्या कोरडवाहू क्षेत्रापुरते र्मयादित ठेवत असून प्रत्यक्षात मात्र संपूर्ण भारतात कापसावर प्रचंड खर्च झाला असताना उत्पादनात मात्र ४0 टक्के घट होण्याचे संकेत मिळत आहे. अशा वेळेस कापसाच्या हमीभावात त्वरित वाढ होणे गरजेचे आहे.
देशात १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंतची कापसाची आवक
वर्ष           भारत           गुजरात              महाराष्ट्र
२0१0     ११८ लाख        २९ लाख               २८ लाख
२0११     ८८ लाख          ४२ लाख             १४ लाख

No comments:

Post a Comment