Thursday, 29 December 2011

देशात कापसाची आवक घटली, हमीभाव वाढवून देण्याची मागणी-लोकसत्ता


देशात कापसाची आवक घटली, हमीभाव वाढवून देण्याची मागणी-लोकसत्ता

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=202514:2011-12-29-19-24-13&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56
नागपूर, २९ डिसेंबर / खास प्रतिनिधी
संपूर्ण देशात कापसाची आवक सुमारे २५ टक्के घटल्याचा दावा करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटावर मात करण्यासाठी हमी भाव वाढवून देण्याची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. 
कापूस महामंडळाने (सीसीआय) जारी केलेल्या माहितीनुसार देशातील बाजारात १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबपर्यंत फक्त ८८ लाख गाठीची आवक झाली. गेल्यावर्षी ११८ लाख गाठींची आवक झाली होती.
गुजरातमध्ये २९ लाख आणि महाराष्ट्रात १४ लाख गाठींची आवक झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात अनुक्रमे ३० टक्के व ५० टक्के घट झाली आहे.
 संपूर्ण देशातील शेतक ऱ्यांवर संकट असल्याने हमीभाव वाढवणे हा एकमेव उपाय असल्याचा दावा समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
सरकारच्या माहितीनुसार देशभरात १२० लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली. त्यातून ३७५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र नापिकीमुळे पहिल्या तिमाहीत २५ ते ३० टक्के घट झाली. सर्वच राज्यातील विविध पक्ष व संघटनांनी कापसाचे हमीभाव वाढवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, हमीभाव वाढवल्यास गिरणी मालकांचे प्रचंड नुकसान होईल, असा युक्तिवाद कृषी मूल्य आयोगाने करून भाव वाढीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला.
कापसाची नापिकी राज्यातील कोरडवाहू क्षेत्रापुरती मर्यादित ठेवता येत आहे. प्रत्यक्षात संपूर्ण देशातच उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment