Monday, 26 December 2011

शेतकरी पॅकेज आत्महत्यांना आमंत्रण देणारे :किशोर तिवारी

शेतकरी पॅकेज आत्महत्यांना आमंत्रण देणारे :किशोर तिवारी
तरुण भारत नागपुर 

यवतमाळ, २५ डिसेंबर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराजचव्हाण यांनी जशी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चा होती त्याचप्रमाणे पॅकेजची मदत जाहीर करून ९०लाख हेक्टरमधील सुमोरे ७ लाखशेतकरयांची निराशा केली असूनमुख्यमंत्र्यांच्या अपुरया मदतीच्या घोषणेमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र व खानदेशमध्ये नापिकीझालेल्या शेतकरयांना दिलासा तर मिळणार नाही, पण नैराश्य वाढून प्रचंड आत्महत्या होण्याची भीतीविदर्भ जनआंदोलन समितीचे नेतेकिशोर तिवारी यांनी व्यक्त केलीवारंवार निवेदने देऊनहीमुख्यमंत्र्यांनी शेतकरयांच्याशेतीमालाच्या मागणीला बगल देऊन मदत जाहीर करतानाही झालेल्या नुकसानाच्या जेमतेम ५ टक्के मदत जाहीर करून सरकारने शेतकरयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
नोकरशाहीने पुन्हा एकदा शेतकरयांच्या तोंडाला पाने पुसली आहे. सरकारच्या पॅकेजमुळे व कापसाच्या हमीभावामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाने व कापसाच्या किमती पडल्यामुळे झालेले नुकसान सरकारच्या मदतीपेक्षा १० पट असून सरकार शेतकरयांच्या जीवावर उठले असून शेतकरयांसाठी राजकीय पक्षांचे सर्वच आंदोलन सरकारने थोतांड सिद्ध केले आहे. कापूस उत्पादक शेतकरयांच्या प्रश्नावर सरकार अशाप्रकारे पळ काढू शकणार नाही. कापसाचा हमीभाव व नापिकीमुळे झालेली नुकसान भरपाई पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकरयांप्रमाणेच द्यावी लागेल,असा गंभीर इशारा विदर्भ जनआंदोलन समितीने दिला आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोरडवाहू शेतकरयांच्या प्रमुख समस्यांना वाचा तर फोडली, मात्र तोडगा न काढता सालाबादप्रमाणे पॅकेजची घोषणा केली. त्याचवेळी भारताच्या कृषिमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतकरयांनी अतिपावसाने बिटी कापसाचे बियाणे लावण्यात चूक केल्याचे खापर फोडून शेतकरयांवर जबाबदारी झटकली, असा आरोप किशोर तिवारी यांनी   केला आहे .

No comments:

Post a Comment