Tuesday, 5 July 2011


१0 लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट-लोकमत 
यवतमाळ। दि. ५ (जिल्हा प्रतिनिधी)

हवामान खात्याचा पावसाविषयी चुकलेला अंदाज, उंदीर व किड्यांनी नष्ट केलेली बियाणे आदी कारणांमुळे विदर्भातील सुमारे १0 लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. अशातच बँकांचे थांबलेले पीककर्जवाटप आणि बियाण्यांच्या तुटवड्यामुळे विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मागील तीन दिवसांत विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील सहा शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंंंंंंंंंंंत तीन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी झाली. मात्र पावसाची हुलकावणी आणि उंदीर व किड्यांनी बियाणे नष्ट केल्याने ४0 टक्के शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. मागील काही दिवसांपासून वरूणराजाने डोळे लावल्याने आता पेरलेले बियाणे बाद ठरण्याची भीती आहे. आतापर्यंंंंंंंंंंंत संपूर्ण विदर्भातील दहा लाख हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन, तुरीची पेरणी उलटली आहे.

दरम्यान, बँकांनी बंद केलेले पीककर्ज वाटप आणि बियाण्यांच्या तुटवड्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रकार वाढत आहे. मागील तीन दिवसांत महादेव श्यामसुंदर (लोही), महादेव चौधरी (कळंब), जयराम तोडसाम (चिखलडोह, जि.यवतमाळ), सुभाष खारोडे (रौंदाळा, जि.अकोला), पंजाबराव मुदरे (उंबरखेड, जि.अमरावती), राजेंद्र कोरे (पळसगाव, जि. भंडारा) या शेतकर्‍यांनी पेरणी उलटल्याने जीवनयात्रा संपविल्याचे विदर्भ जन आंदोलन समितीने म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मागील १५ दिवसांपासून पीककर्ज वाटप करणार्‍या सहकारी बँकांचा पतपुरवठा रोखला. याचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्याला बसला. पीककर्ज नियमित फेडूनही जिल्हा बँक पीककर्ज देण्यास असर्मथ ठरत आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांना नवीन कर्ज वितरणाचे आदेश नसल्याने वाटप रोखले आहे. 

No comments:

Post a Comment